प्रशाले विषयी थोडेसे ......
विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित व्यंकटेश विद्यालय, ही घोडखिंडी खेड्यातील नावाजलेली शाळा. ही शाळा यवतमाळपासून ८ कि.मी. अंतरावर आहे. विद्यालयाची स्थापना २ जुलै १९८४ रोजी झाली. २७ विद्यार्थ्यांनी सुरु झालेल्या या शाळेचे आज ग्रामीण आदिवासी भागातील मोठ्या शाळेत रूपांतर झालेले आहे . येथे इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग भरतात.
व्यंकटेश विद्यालय म्हणजे शिस्त आणि सुसंस्कार ! आणि म्हणूनच लोकप्रिय. कोणत्याही शाळेची गुणवत्ता ही शालांत परीक्षेच्या निकालावर ठरत असते. ही निकालाची परंपरा शाळेने कायम राखलेली आहे. क्रीडाक्षेत्रातही शाळेचा प्रगतीचा आलेख चढताच आहे. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा व संगणक प्रयोगशाळा आहेत. शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी ५५५ व शिक्षकांसाठी २१६ पुस्तके आहेत. शाळेत घोष पथक आहे.
मुख्याध्यापक - सौ स्वाती जोशी
शाळेचा पत्ता - मु पो - घोडखिंडी, जिल्हा - यवतमाळ ४४५००१, महाराष्ट्र, भारत.
युडायस क्रमांक – २७१४१५०४३०२
फोन नंबर - ९८५०४ ४८०८४

