राष्ट्रीय पुरस्कार घोषित – ऋषिकेश काकडेचा विवेकानंद विद्यालयात सत्कार
येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात ऋषिकेश प्रशांत काकडे या विद्यार्थ्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेत सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
ऋषिकेशला सन २०२१ चा 'डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रेन क्रियेटीव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड' जाहिर झाला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या १५ ऑक्टोबर या जयंतीदिनी तो जाहिर केला जातो. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रियेटीव्ह, इनोव्हेटीव्ह, टेक्निकल आयडियासाठी हनी बी नेटवर्क, एसआरआयएसटीआय आणि जीआयएएन या संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरिता यंदा संपूर्ण भारतातून ४२०० संकल्पना आल्या होत्या. त्यामधून १२ मुलांची निवड झाली. त्यातील ११ विद्यार्थी नववीपुढील होते. विवेकानंद विद्यालयात शिकणारा ऋषिकेश हा एकटाच वर्ग ७ वीचा आणि महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. कचरा निर्मूलन व व्यवस्थापनासाठी त्याने सुचविलेल्या कल्पनेसाठी त्याला हा पुरस्कार घोषित झाला.
ऋषिकेशच्या या यशाबद्दल त्याचा बुधवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी विवेकानंद विद्यालय, यवतमाळ तर्फे विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायकदादा दाते व सदस्या सुषमा दाते तसेच मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसमोर झालेल्या या कार्यक्रमात ऋषिकेश व त्याच्या वडिलांनी मनोगत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष विनायक दाते व मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनी ऋषिकेशचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. संचालन जया बेहरे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.
येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयात ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दादा दाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक, सहसचिव सौ. शर्मिला फाटक, संचालक सौ. सुषमा दाते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचे स्वागत विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापक कल्पना पांडे, पर्यवेक्षक प्रशांत सिंगरू यांनी केले.
विवेकानंदच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनी प्रास्ताविक तर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख दिनेश गहरवार यांनी संचालन केले. यावेळी दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोविड -१९ लसीकरण अभियान
कोविड -१९ लसीकरण अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लसीकरण शिबिर राबविण्यात येत आहे. रविवार दिनांक १८ जुलै २०२१ रोजी येथील विवेकानंद विद्यालयात संस्कार भारती व विवेकानंद विद्यालयाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले. कोविशिल्डच्या दोन्ही मात्रांचे दोनशे डोज लाभार्थ्यांना देण्यात आले.
या शिबिरास यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय अग्रवाल, विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, सचिव सतीश फाटक, संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार, जिल्हाप्रमुख अनंत कौलगीकर, यवतमाळचे अध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, जीवन कडू, प्राची बनगीनवार प्रमुख्याने उपस्थित होते. या लसीकरण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हेरंब पुंड, विवेक अलोणी, दिनेश गहरवार, चंद्रशेखर सवाने, संतोष पवार, संजय येवतकर, महेश कोकसे, निलेश पत्तेवार, प्रफुल्ल गावंडे, पूनम नैताम, अनुपमा दीक्षित, सचिन ढोबळे, प्रवीण जिरापुरे, सचिन देशपांडे, सुधीर कानतोडे, दिनेश रणनवरे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आरोग्य विभागाच्या विभागाच्या वतीने अभिषेक खडसे, अर्चना कातोरे, सुनीता किनाके, कांता मेंढे, मेघा पाईकराव व शुभम खडतकर यांनी लसीकरण केले. उपस्थित अधिकारी व वैद्यकीय चमूचे विवेकानंद व संस्कार भारतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या समारंभाचे संचालन विवेक कवठेकर यांनी केले.
स्थानिक विवेकानंद विद्यालयाला मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-2021 निधीमधून ऑल इन वन लेसर प्रिंटर १३-६-२०२१ रोजी भेट देण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. काळे यांनी ही भेट स्विकारली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायकदादा दाते व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांचे आभार मानले.
विवेकानंद विद्यालय - 26 जून 2019 रोजी प्रवेशोत्सव साजरा
येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात आज 26 जून 2019 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा झाला.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी नव्या सत्राकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समन्वयक श्री. विजय कासलीकर यांनी माजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. श्री. शैलेश बावडेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. अजय सकरावत व श्री. वासुदेव विधाते यांनी त्यांना या शाळेतून मिळालेल्या उत्तम संस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच नवीन विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देण्यात आला. त्याचप्रमाणे वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावर्षी निवृत्त होत असलेले मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे व प्रयोगशाळा सहाय्यक लक्ष्मण वानखडे यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्याम डगवार, सचिन चौधरी, प्रशांत पोहणकर, हरी दोडशेट्टीवार, प्रेमेंद्र रामपूरकर, संजय काकाणी, उमेश हांडा, राजू देशमुख, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र नार्लावार, सुनील जोशी, राजेश अमरावत, डॉ. चंद्रशेखर देशपांडे, संजय गंडेचा, डॉ. प्रदीप झिलपिलवार, प्रकाश शिदड हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात आज 26 जून 2019 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा झाला.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी नव्या सत्राकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समन्वयक श्री. विजय कासलीकर यांनी माजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. श्री. शैलेश बावडेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. अजय सकरावत व श्री. वासुदेव विधाते यांनी त्यांना या शाळेतून मिळालेल्या उत्तम संस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच नवीन विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देण्यात आला. त्याचप्रमाणे वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावर्षी निवृत्त होत असलेले मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे व प्रयोगशाळा सहाय्यक लक्ष्मण वानखडे यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्याम डगवार, सचिन चौधरी, प्रशांत पोहणकर, हरी दोडशेट्टीवार, प्रेमेंद्र रामपूरकर, संजय काकाणी, उमेश हांडा, राजू देशमुख, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र नार्लावार, सुनील जोशी, राजेश अमरावत, डॉ. चंद्रशेखर देशपांडे, संजय गंडेचा, डॉ. प्रदीप झिलपिलवार, प्रकाश शिदड हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
महेश वासुदेव तोटे
95.60 टक्के
प्रथम क्रमांक
साहिल राजेंद्र निनगुरकर
95.60 टक्के
प्रथम क्रमांक
आनंद सुधाकर येरावार
92.40 टक्के
द्वितीय क्रमांक
अभिषेक विजय मानेकर
90.40 टक्के
तृतीय क्रमांक
विवेकानंद विद्यालयचा १० वी २०१८-१९ चा निकाल ८१.१८ %
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालात विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाने उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली. शाळेचा निकाल 81.18 इतका लागला.
शाळेतील महेश वासुदेव तोटे आणि साहिल राजेंद्र निनगुरकर या विद्यार्थ्यांनी 95.60 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी संस्कृत व गणितात 99 गुण प्राप्त केले. आनंद सुधाकर येरावारने 92.40 टक्के गुण घेऊन द्वितीय तर अभिषेक विजय मानेकरने 90.40 टक्के गुणांसह तृतीय स्थान पटकावले. 8 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. प्रावीण्य श्रेणीत 36 तर प्रथम श्रेणीत 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विवेकानंद विद्यार्थ्यांचे कलचाचणी समुपदेशन - २ मे २०१९
शालेय शिक्षण घेत असतानाच आपला कल व अभिक्षमता ओळखून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच देशविकासाकरिता व्हावा यादृष्टीने राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी आयोजित केली. डिसेंबर-जानेवारी महिन्यात राज्यभर राबविलेल्या या चाचणीचा निकालही शालांत परीक्षेपूर्वी प्रमाणपत्राद्वारे कळविला. या कल व अभिक्षमतेचा अर्थ विद्यार्थी व पालकांना समजावा यासाठी परीक्षेनंतर २ मे २०१९ रोजी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला.
येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयातही वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणी समुपदेशन करण्यात आले. शालेय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्याध्यापक मोहन केळापुरे, पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे, तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर बनारसे, दत्तात्रय देशपांडे आणि शिक्षण विभाग गट संसाधन केंद्राच्या कलचाचणी समन्वयक वैशाली गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रारंभी दत्तात्रय देशपांडे यांनी प्रास्ताविकातून कलचाचणी व समुपदेशनाचे महत्त्व विशद केले. किशोर बनारसे यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांचा कल तसेच अभियोग्यता विषयक मार्गदर्शन करून निवडक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडविल्या.
संचालन विवेक कवठेकर यांनी केले. आभारप्रदर्शन मीनाक्षी काळे यांनी केले. वैशाली ठाकरे, हेरंब पुंड, विवेक अलोणी यांनी स्वागत केले. यावेळी दहावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी समुपदेशनाबद्दल समाधान व्यक्त केले.
राज्य भाषा सल्लागार समितीवर यवतमाळचे विवेक कवठेकर
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करणे व त्याकरिता विविध विषयांचे परिभाषा कोश तयार करणे या उद्देशाने १९६१ साली महाराष्ट्र शासनाने भाषा सल्लागार मंडळ स्थापन केले होते. प्रशासनिक वापरात भाषा संवर्धन व विकासासाठी भाषा सल्लागार समितीची वेळोवेळी पुनर्रचना करण्यात येते. या समितीवर यवतमाळचे विवेक कवठेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयातील भाषाशिक्षक, 'यशदा'चे प्रशिक्षक मार्गदर्शक, विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून स्तंभलेखन करीत आलेले विवेक कवठेकर यांना १९९८ मध्ये झालेल्या पहिल्या विदर्भस्तरीय 'अक्षर' विद्यार्थी साहित्य संमेलनासह 'अक्षरसाधना' राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून अनुभव आहे. त्यांनी मराठीचे आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर जन्मशताब्दीचे संयोजन तथा स्मृतिग्रंथाच्या संपादनासह साहित्य, संस्कृतीविषयक पुस्तकं आणि शासनाच्या लोकाभिमुख अभियानांच्या पुस्तिकांचे संपादन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना निवड समितीचे अध्यक्ष तसेच संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत सहमहामंत्री असलेल्या कवठेकर यांना रोटरीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त असून एक उत्तम वक्ते, निवेदक, कार्यक्रमांचे आयोजक असा लौकिक आहे. त्यांच्या या निवडीबद्दल यवतमाळचे पालकमंत्री ना. मदन येरावार यांनी अ. भा. साहित्य संमेलन कार्यालयात त्यांचा सत्कार केला. विवेक कवठेकर यांचे विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, सचिव श्री. सतीश फाटक, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, संचालक सौ. सुषमा दाते, समन्वयक श्री. विजय कासलीकर, मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे, पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम बोबडे व शिक्षकवृंदाने अभिनंदन केले आहे.
प्रथमेश रमेश राठोड
९८.२० %
शाळेत प्रथम
कु सुविधा कैलास राठोड
९७.८० %
शाळेत द्वितीय
अथर्व गजानन शाहाकार
९६ %
शाळेत तृतीय
विवेकानंद विद्यालयाचा २०१७-१८ शालांत परीक्षेचा उत्कृष्ट निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र २०१७-१८ परिक्षेचा जाहीर झालेल्या निकालात यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. शाळातून परीक्षेस २०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी १६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८४.५० इतकी राहिली.
९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थींची संख्या ११ इतकी असून प्रथमेश रमेश राठोड याने ९८.२० टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला त्याने सामाजिक शास्त्र व संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. कु सुविधा कैलास राठोड हिने ९७.८० टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळविले. तिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. तर अथर्व गजानन शाहाकार ९६ टक्के गुणांसह तृतीय स्थानी राहिला.
९० टक्के पेक्षा अधिक गुण - आदित्य संजय इंगोले ९५.४०, अनुज जयंत करोडदेव ९५.००, तेजपाल राजूसिंग चव्हाण ९४.६०, वैभव भास्कर साठे ९४.४०, सानिध्य मिलिंद कांबळे ९२.६०, कु प्रणाली प्रल्हाद चंद्र ९२.२०, शंतनू सुनील दोंडाल ९१.८०, नचिकेत अरविंद चौधरी ८९.८० टक्के यांचा समावेश राहिला.
शाळेतील ४५ विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण घेत विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ४४ विद्यार्थी ६० टक्के पेक्षा अधिक गुण घेत प्रथम श्रेणीत पास झाले , द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थि संख्या ६० राहिली