Rani Laxmibai Vidyalaya

करोना लसीकरण शिबीर

राणी लक्ष्मीबाई विद्यालयामध्ये आज दिनांक ९/७/२०२२ रोजी लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये वर्ग सातवा ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. अतिशय यशस्वीरित्या लसीकरणाचा कार्यक्रम श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आनंदी वातावरणामध्ये पार पडला.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात वृक्ष लागवड सप्ताह उद्बोधन शिबीर प्रारंभ 

राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे दिनांक 7/7/2022 रोजी आझदी का अमृत महोत्सव या राष्ट्रीय उपक्रमा अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग यवतमाळ याच्या संयुक्त विधमाने शाळेच्या प्रांगणात झाडे लावा झाडे जगवा या शासन धोरणात्मक निर्णयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी शाळेचे  भिसे सर आणि सामाजिक वनीकरण विभाग प्रमुख संजय केराम  (RFO) याच बरोबर विभागातील अधिकारी मुनेशवर साहेब, मडावी साहेब, वानखडे साहेब आणि पथनाट्य प्रमुख पिंटू मेश्राम हे उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमातून झाडांची लागवड किती महत्वाची आहे व झाडांना मानवी जीवनात किती महत्व आहे हे अगदी सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुलसंगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मडावी सर यांनी केले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते असे प्रबोधनात्मक उपक्रम शालेय स्तरावर वेळोवेळी व्हावेत अशा आशावाद भिसे सर यानी व्यक्त केला आणि कार्यक्रमाची सांगता सदा सर्वदा या प्रार्थनेने करण्यात आली

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

बुधवार दिनांक २९/०६/२०२२ रोजी  सत्र २०२२ - २०२३ चा पहिला दिवस राणी लक्ष्मीबाई विद्यालयात प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. नवीन विद्यार्थिनींचे शिक्षिकांनी औक्षण करून स्वागत केले. शालेय प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते उपस्थित होते तसेच विवेकानंद विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री अजयजी सक्रावत, श्री श्याम डगवार, श्री पोहणकर, श्री दौडशेट्टीवार, श्री जोशी व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मेघा भास्करवार हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन झाले. सर्वांचा स्वागत सत्कार घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ५ वी च्या विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शालेय भेट वस्तूंचे वितरण केले.
श्री सक्रावत व श्री भास्करवार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कल्पना पांडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री विनायक दाते यांनी विद्यार्थिनींना शाळेची शिस्त अंगी बांधण्यासोबतच या संपूर्ण आनंददायी वातावरणाचा आणि सहध्यायी मैत्रिणींसोबत सहजीवनाचा आनंद अनुभवा, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली कुलकर्णी केले तर आभार प्रदर्शन श्री सुभाष कुळसंगे यांनी केले.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

21 जून 2022 रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यात विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम प्रकार घेण्यात आले.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. श्रीकांत देशपांडे यांनी दैनंदिन जीवनात योग कसा आवश्यक आहे व रोगमुक्ती कशी होऊ शकते या विषयीचे महत्त्व सांगितले.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा २०२१-२२ दहावीचा निकाल 92.54%

17 जून, २०२२ रोजी माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहिर झाला. स्थानिक विशुध्द विद्यालयाद्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा १० वी चा निकाल 92.54 टक्के लागला. विद्यालयातील कु.मोहिनी राहाणे  97.20 % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटविला तर कु. जान्हवी निकम  ही  95.80 % गुण प्राप्त करून द्वितीय आली . तसेच कु श्रमिता नगराळे  ही 94.80 % प्राप्त करून शाळेतून तृतीय आली. उत्तीर्ण विद्यार्थीनींपैकी 15 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या.
यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक  दाते, उपाध्यक्ष सौ. विद्याताई केळकर, सचिव श्री. सतीश फाटक, सहसचिव सौ. शर्मिला स. फाटक, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, संचालक सौ. सुषमाताई दाते, श्री. चंद्रकांत रानडे, श्री. विजयराव कासलीकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कु. कल्पना पांडे, पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरु, सर्व दहावीचे वर्ग शिक्षक तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदानी कौतुक केले आहे.

कु. मोहिनी राहाणे
97.20% गुण
प्रथम क्रमांक

कु. जान्हवी निकम
95.80% गुण
व्दितीय क्रमांक

कु. श्रमिता नगराळे
94.80 % गुण
व्दितीय क्रमांक

'हरित सेना अंतर्गत उपक्रम - आकाशकंदील, दिवे आणि लक्षमीची पावले इ. साहित्य तयार करणे.
राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे हरित सेनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने विविध साहित्य स्वतः विद्यार्थीनींनी तयार केले आणि आपल्या सहभागातून आम्ही अभ्यासाबरोबरच कलानिपूण आहोत हाच संदेश दिला. दिवाळी सणासाठी उपयुक्त असलेले साहित्य स्वतः बनवून आणले आणि मार्गदर्शक शिक्षक हरितसेना प्रमुख कु. सविता अतकरे आणि सुभाष कुळसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 26-10-2021 रोजी प्रदर्शनीचे आयोजन केले. आखीवरेखीव आणि सुबक पध्दतीने कलाकुसर केली यातूनच आमचा गाईड विभाग या दिव्यांची विक्री करून खरी कमाई सुध्दा करतील. छानच उपक्रम राबविण्यात आला.
हरितसेना अंतर्गत हरितसेनेचे शिक्षक त्यांनी हरितसेना वर्गासाठी दिवाळी औचित्य साधून विद्यार्थीनींना मार्गदर्शनपर सूचनाही दिल्या.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कल्पना पांडे तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू उपस्थित होते .या प्रदर्शनास सेवानिवृत्त माजी प्रा. सौ. माणिक मेहरे रोटरी क्लबच्या अध्यक्ष तसेच प्रयासवन कार्यात सहभाग यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे संचालक तथा समन्वयक श्री. विजयराव कासलीकर यांनी सुध्दा भेट दिली आणि विद्यार्थीनी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

धनश्री ग.पुसदकर
97.2% गुण
प्रथम क्रमांक

प्रियल रा.ताजणे
96.4% गुण
व्दितीय क्रमांक

सृष्टी प्र.डंभारे
96.4% गुण
व्दितीय क्रमांक

पैंजन वा. इंगळे
95.4% गुण
तृतीय क्रमांक

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा २०२०-२१ दहावीचा निकाल 100%
१६ जुलै २०२१ रोजी दहावीचा निकाल जाहिर झाला. स्थानिक विशुध्द विद्यालयाव्दारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा दहावीचा निकाल 100% लागला असून. शाळेतील 162 परिक्षेस पात्र विद्यार्थीनींपैकी 132 विद्यार्थी नींनी प्राविण्य मिळवले आहे तर 30 विदयार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेत कु. धनश्री ग. पुसदकर - 97.20% गुण मिळवून प्रथम आली आहे. व्दितीय क्रमांक दोन विद्यार्थीनीना - कु. प्रियल रा. ताजणे - 96.40%, आणि कु. सृष्टी प्र. डंभारे - 96.40% मिळाला आहे, तृतीय क्रमांक  - कु. पैंजन वा. इंगळे- 95.40%
शाळेतील सर्व विद्यार्थीनींचे विशुध्द संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले असून भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या.

मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांचेकडून लेसर प्रिंटर भेट.

स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाला मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-2021 निधीमधून ऑल इन वन लेसर प्रिंटर दि. १४-६-२०२१ रोजी भेट देण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कल्पना पांडे यांनी ही भेट स्विकारली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायकदादा दाते व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांचे आभार मानले.

कु. विशाखा अतुलकुमार सारडे
99.8% गुण
प्रथम क्रमांक

कु. श्रेया संदीप देशपांडे
99.6% गुण
व्दितीय क्रमांक

कु. संस्कृती गणेश लोंदे
97.8% गुण
तृतीय क्रमांक

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा २०१९-२० दहावीचा निकाल 100%
स्थानिक विशुध्द विद्यालयाव्दारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा दहावीचा निकाल 100% लागला असून उत्तीर्ण विद्यार्थीनींपैकी 25 विद्यार्थीनींनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयातील कु. विशाखा अतुलकुमार सारडे  99.8% गुण प्राप्त करुन प्रथम आली, तर कु. श्रेया संदीप देशपांडे हिने 99.6% गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक पटकावला. कु. श्रेया संदीप देशपांडे हिने संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. कु. संस्कृती गणेश लोंदे ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकावर असुन तीने 97.8% गुण प्राप्त केले. तीने गणित व संस्कृत या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. 90% पेक्षा जास्त गुण असणा-या 25 विद्यार्थिनी शाळेसाठी अभिमानास्पद ठरल्या. संस्कृत विषयामध्ये 7 विद्यार्थिनींनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले असुन गणित विषयात एका विद्यार्थिनीने 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे विशुध्द संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले असून भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या.

“बेटा जरा जपून”

तारूण्याच्या उंबरठयावर पाउल टाकताना येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय यावर उत्तम असे मार्गदर्शन डॉ. गिरीष माने आणि डॉ. वृषाली माने यांनी केले. विशुध्द विद्यालय संस्थेअंतर्गत राणी लक्ष्मीबाई विद्यालयात रोटरी क्लब यवतमाळच्या वतीने किशोरवयीन मुलींच्या समस्या तथा INTERACT CLUB ची स्थापना दि. 8 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरीष माने आणि डॉ. वृषाली माने, संस्थेचे सचिव श्री. सतिशजी फाटक, सहसचिव सौ. शर्मिलाताई फाटक, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश गढीकर, अजय म्हैसाळकर, दिलीप राखे, अभिजित दाभाडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे, पर्यवेक्षक श्री प्रशांत सिंगरू उपस्थ‍ित होते. दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरवात झाली.
ज्ञानरूपी मार्गात पदक्रमण करतांना मार्ग काढू प्रगतीचा मात्र प्रगतीपथावर भान ठेवू या. सुसंस्कृततेचा भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या विद्यार्थी जीवनात अनेक संकटे येतात, या संकटांचा आव्हान म्हणून स्विकार करावा. समाजकार्यास वयाचे बंधन नसावे असे मत गढीकरांनी व्यक्त केले. किशोरवयीन आरोग्यशिक्षण या संदर्भात बोलताना सर्वच कळयांना हक्क आहे उमलण्याचा या ओळीचा अर्थ डॉ. माने यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितला. मानसिक, शारीरिक तसेच बौध्दीक स्वास्थ्य कसे राखावे याकरिता विद्यार्थिनींची भूमिका, मैदानी खेळाचे महत्व, व्यायाम व आरोग्य या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थिनींना सांगीतली. श्री. सतिशजी फाटक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींनी वाहतूकीचे नियम पाळावे, लैंगिक शिक्षणाची गरज, इंटरनेट, मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी आपले मत व्यक्त केले. “ स्त्रीजन्माची खंत कधीही बाळगू नये, माता, पिता, शिक्षक हे आपले हितचिंतक असतात त्यांचा सन्मान करावा असा अमूल्य संदेश डॉ. गिरीष माने व डॉ. वृषाली माने यांनी विद्यार्थिनींना दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. महाजन यांनी केले व कु. भगत यांनी मान्यवरांचे आभार मानले.

माता पालक संघ व पालक शिक्षक संघाची स्थापना.

स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयामध्ये दि. 27 जुलै 2019 रोजी पालक सभा संपन्न् झाली. सभेला अध्यक्ष म्हणून विशुध्द विद्यालय संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते उपस्थित होते. उपाध्यक्ष विद्याताई केळकर, सचिव सतिश फाटक, सहसचिव शर्मिलाताई फाटक, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक सुषमाताई दाते, शाळा समिती सदस्य् माधुरीताई रानडे, समन्व्यक विजय कासलीकर, मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे, पर्यवेक्षक प्रशांत सिंगरू, पा.शि. संघ 2018-2019 चे उपाध्यक्ष जितेंद्र हिंगासपुरे तसेच माता पालक संघाच्या उपाध्यक्षा अश्विनी भाकरे उपस्थित होत्या. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प लक्षात घेउन मान्यवरांचे स्वागत तुळशी रोपाने करण्यात आले.
प्रतिमा पुजन व सरस्वती वंदनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे यांनी प्रस्ताविकेतून शालेय माहिती व प्रगतीचा आढावा घेतला तसेच शाळेतील उपक्रमांबद्दल माहिती दिली. पर्यवेक्षक प्रशांत सिंगरू यांनी मागील वर्षीच्या पालक शिक्षक संघाच्या आमसभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. पालकांच्या मनोगतामध्ये प्रितम देवतळे यांनी मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात तसेच विनोद कांबळे, जितेंद्र हिंगासपूरे यांनी विद्यार्थिनींनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रगती करावी व त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढावा अशी आशा व्यक्त केली. सुनिल पवार, गीता राखडे यांनीही आपले विचार मांडले.
संस्थेचे सचिव सतिश फाटक यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. विद्यार्थिनिंना स्वच्छता व मेहनत याची सवय लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या अध्यक्षिय भाषणत विनायक दाते यांनी शिस्तीचे महत्व विशद केले व शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पालक प्रतिनिधींची निवड लोकशाही पध्दतीने करण्यात आली. सर्व प्रतिनिधींचे शिक्षकांनी अभिनंदन केले. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून संतोष नथ्थुजी गदई सहसचिव शिल्पा रितेश जाजू तर माता पालक संघाच्या उपाध्यक्षा अंजली चंद्रकांत पाटील सहसचिव प्राची शामकांत नेवे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सविता अतकरे तर आभारप्रदर्शन दंवेंद्र भिसे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात प्रवेशोत्स्‍व व राजर्षी शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी.

      राणी लक्ष्मीबाई विद्यालयात राजर्षी शाहु महाराज जयंती व प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष्‍ श्री. विनायक दाते, सचिव श्री. सतिश फाटक, सहसचिव सौ. शर्मिला फाटक, सदस्य्  सौ सुषमा दाते, संस्थेचे समन्वयक श्री. विजय कासलीकर, अध्यक्ष श्री. विनायक दाते यांच्या कन्या सौ. मीरा बावडेकर, जावई श्री. शैलेश बावडेकर, विवेकानंद विद्यालयातील 1987 चे माजी विद्यार्थी विनोद शिंदे, अजय सक्रावत व मित्रमंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे, पर्यवेक्षक श्री प्रशांत सिंगरू उपथित होते.
दीप प्रज्वलन व मान्य्‌वरांच्या स्वागतानंतर मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री. देवेन्द्र् भिसे यांनी राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त् आपले मनोगत व्यक्त केले. मंचावरील मान्यवरांनी आपले मनापेगत व्यक्त केले. त्यानंतर शासनाच्या मोफत पाठयपुस्तक योजने अंतर्गत वर्ग 5 ते 8 च्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पाठयपुस्तके देण्यात आली. तसेच विवेकानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना भेटवस्तु दिल्या. संस्थेचे अध्यक्ष्‍ श्री. विनायक दाते यांनी आपल्या भाषणतून विद्यार्थिनींना भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वंदना भगत व आभार प्रदर्शन श्री. साहेबराव चव्हाण यांनी केले.

राधिका मिलींद अंबुलकर
94.60 % गुण
प्रथम क्रमांक

पूर्वा राजेश पेटेवार
93.40 % गुण
द्वितीय क्रमांक

वैभवी गणेश ढोमणे
93.00 % गुण
तृतीय क्रमांक

१० वी २०१८-१९ चा निकाल 85.32 टक्के

स्थानिक विशुध्द विद्यालया द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा १० वी चा निकाल 85.32  टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थीनींपैकी 62  विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या. यातील 16 विद्यार्थिनिंनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण  प्राप्त करून यशोशिखर गाठले.
विद्यालयातील कु राधिका मिलींद अंबुलकर हिने 94.60 % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, कु. पूर्वा राजेश पेटेवार हिने 93.40 % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक व वैभवी गणेश ढोमणे हिने 93.00% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. कु राधिका मिलींद अंबुलकर हिने संस्कृत या विषयात  १०० पैकी  १०० गुण प्राप्त केले.

घोष वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक

क्रिडा भारती यवतमाळ द्वारा आयोजित, शिव समर्थ ढोल ताशा व ध्वज पथक यवतमाळ यांच्या सहयोगाने आंतरशालेय घोष वादन स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

सावित्रीबाई फुले जयंती साजरी : ३-१-२०१९

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८व्या जयंती निमित्त वर्ग 9 साठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. ९अ चा वर्ग विजेता ठरला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून  श्री कुळसंगे सर व कु. उमप मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली. विद्यार्थिनींनी 'मी सावित्रीबोलतेय' हा एकपात्री प्रयोग सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. प्रमुख  वक्त्या  सौ. संगिता जाधव यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती देशपांडे होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी हामंद हिने केले. आभार कु. वैभवी निघोट हिने मानले.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील देवयानी सुवर्णपदकाची मानकरी

दि.23/12/2018 ते 26/12/2018 या कालावधीत मुंबई येथे राष्ट्रीय स्तरावरील 64वी शालेय क्रिडा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धांमध्ये 'रोल बॉल स्केटिंग' ह्या क्रिडाप्रकारात राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कु. देवयानी विनोद नित ही विद्यार्थिनी सहभागी झाली होती. तीच्या चमूने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून  देवयानी सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. अभिनंदन!!!

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात बक्षीस समारंभाचे आयोजन

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा बक्षीस वितरण समारंभ गुरूवार दिनांक 20-12-2018 रोजी उत्साहात पार पडला, या प्रसंगी मंचावर विशुध्द विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, सचिव श्री. सतिश फाटक सहसचिव सौ. शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, संचालक सौ.सुषमाताई दाते, श्री. अशोक कंचलवार, डॉ.रजनी कंचलवार, समन्वयक श्री. विजयराव कासलीकर, शाळा समिती सदस्या सौ. मंगलाताई तांबेकर, प्रमुख पाहूणे श्री. चंद्रकांत रानडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र हिंगासपुरे, मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे, पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू तसेच पालक व देणगीदार उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांचे हस्ते शाळेचे हस्तलिखित चंद्रकोरचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्याथिनिंना पारितोषिके देण्यात आली. कु. वैष्णवी राजू बोडखे शालांत परिक्षेत 98.40 प्राप्त करून विद्यालयातून प्रथम आली तीला 25 पारिताषिके प्राप्त झाली., कु. तन्वी मंगेश कंवर या विद्यार्थिनीने सुध्दा अनेक पारितोषिके प्राप्त केली.
याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. 21 वे शतक स्त्रियांचे असुन विद्यार्थिनिंनी त्यादृष्टीने वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायली कुळकर्णी तसेच बक्षिसांचे वाचन रश्मी राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रशांत सिंगरू यांनी केले.

हॉकी स्पर्धेत विजय
क्रीडा व युवकसेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सहकार विद्यामंदीर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन दिनांक 4 ते 6 आक्टोबर 2018 दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची चमू विजयी झाला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. या संघात सायली वझाडे, स्मृती बिजागरे, पलक सवाईमुल, श्वेता धुमाळ, ईश्वरी डंभे, गायत्री पुरी, संस्कृती आत्राम, चंदना चाहांदे, जान्हवी वानखडे, रियानी गाडेकर, खुशी गवळी, राधा जाधव, समिता हांडे, मिनल शिवणकर, विदुला केळतकर, श्रेया वासेकर, प्रिती गवळी, आयुषी राठोड या विद्यार्थिनींचा सहभाग होता. खेळाडूंना क्रिडा शिक्षक श्रीकांत देशपांडे, मुकुंद हामंद, प्रशिक्षक मनिषा आकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रीडा व युवकसेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापुर आणि जिल्हा क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धा दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर 2018 दरम्यान मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम कोल्हापुर संपन्न झाल्या. या स्पर्धेमधुन महाराष्ट्र राज्याचा हॉकी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला. यात स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची कु. सायली प्रफुल्ल वझाडे हीची निवड करण्यात आली.
दिनांक 29 नोव्हेबर ते 3 डिसेंबर 2018 या कालावधीत रांची येथे 17 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील अंतीम फेरीत महाराष्ट्र राज्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या संघात  स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची कु. सायली प्रफुल्ल वझाडे हिने गोल किपरची भुमिका यशस्वीपणे पार पाडली.
खेळाडूंच्या यशाबद्दल विशुध्द विद्यालय संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्याऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले.

जागतिक एड्स दिवस

जागतिक एड्स दिवस दि. १-१२-२०१८ रोजी होता. त्या वेळी एड्स निर्मुलन जन जागृती चा कार्यक्रम घेण्यात आला, विद्यार्थिनींना एड्स संबंधी माहिती देण्यात आली. विद्यार्थीनिनी मानवी शृंखलेतून एड्स चे रेड रिबीन हे चिन्ह साकारले.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

मुख्याध्यापिाका सौ. ज्योती देशपांडे यांच्या अध्यक्षतेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन  दि. 08/09/2018  रोजी साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते श्री. सुभाष कुळसंगे यांचे मार्गदर्शन पर भाषणात जगातील विविध देशांची साक्षरतेची आकडेवारी सांगितली व भारताच्या सद्यस्थितीतील साक्षरते विषयी विस्तृत माहिती दिली.

१५ ऑगस्ट २०१८ - स्वातंत्र्यदिन

विशुद्ध विद्यालय द्वारा संचलित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या संयुक्तविद्यमाने 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्सव, शालेय प्रांगणात उत्साहात साजरा झाला. विशुद्ध विद्यालयाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, संचालक मंडळाचे सदस्य, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विविधतेत एकता हि संगीतमय नाटिका व  पर्यावरणाचे रक्षण करा हा संदेश देणारी नाटिका सादर केली. शांततेचे प्रतिक म्हणून आकाशात कबुतरे उडवली. विद्यार्थ्यांची भाषणे व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.

गुरूपोर्णिमा उत्स्‍व

 दि. 27/07/2018 रोजी मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे यांच्या अध्यक्षतेत गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते श्री. प्रसाद कुळकर्णी यांनी भारतातील प्राचीन गुरूपरंपरा याविषयी मार्गदर्शन केले. कृष्ण-सांदिपनी, द्रोणचार्य-अर्जुन विश्वामित्र-राम व लक्ष्मण अशा प्रसिद्ध गुरू-शिष्यांविषयी माहिती दिली. विद्यालयातील विद्यार्थीनींचा सक्रीय सहभाग होता.

टिळक पुण्यतिथी

दि. 01/08/2018 रोजी विशुध्‌द विद्यालय संस्थेतर्फे आझाद मैदानावरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण  करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व घटक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. शाळेतील कार्यक्रमात  अध्यक्ष व प्रमुख वक्ते श्री. प्रशांत सिंगरू यांनी टिळकांची राष्ट्रनिष्ठा व बाणेदारपणा यावर मार्गदर्शन केले  टिळकांच्या कार्याविषयी विस्तृत माहिती दिली.

योगदिन

दि. 21/06/2018 रोजी पर्यवेक्षक श्री प्रशांत अ सिंगरू यांच्या प्रमुख उपस्थितीत योगदिन सम्पन्न झाला. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. श्री. श्रीकांत देशपांडे, श्री. साहेबराव चव्हाण यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकांकरिता मार्गदर्शन केले. योगसाधना केल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली.

नवीन विद्यार्थिनींचे सत्र 2018-19 मधे स्वागत

दि. 26-०६-२०१८ रोजी संस्थेचे माजी विद्यार्थी श्री. अजय सक्रावत व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत नवीन प्रवेश प्राप्त विद्यार्थींनींचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देवून स्वागत करण्यात आले. सोबत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या वेळी विशुध्‌द विद्यालय संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक, सहसचिव सौ. शर्मिलाताई फाटक समन्वयक श्री. विजयराव कासलीकर, मुख्याध्यापिका सौ. ज्योती दी. देशपांडे, पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू इत्यादी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले

२०१७-१८ - १० वी चा निकाल ९५.७२ टक्के

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा सत्र २०१७-२०१८ चा १० वी चा निकाल ९५.७२ टक्के लागला. यावर्षी शालान्त परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण १८७ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी १७९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.

उत्तीर्ण विद्यार्थीनीन पैकी ५२ विद्यार्थीनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या. यातील १८ विद्यार्थीनिनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून यशोशिखर गाठले आहे. विद्यालयातील कु. वैष्णवी राजू बोडखे ९८.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर कु. तन्वी मंगेश कंवर ९८.०० टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमाक प्राप्त केला.

कु वैष्णवी राजू बोडखे हिने संस्कृत व गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. कु. जुही विनोद ठाकरे हिने संस्कृत विषयात तर कु. संजना सुहास कानांव हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. कु. वैभवी गजानन माहुरे ९६.८०, संजना सुहास कान्नव ९६.६०, कु. तनुश्री राजेंद्र मुके ९६.२०, कु. नंदिनी नरेंद्र जगदाळे ९६.६०, कु. धनश्री सुभाष आगाशे ९५.४०, कु. हितैषी मनोज नामदेववार ९४.२०, कु. ऋतुजा सुभाष आंबटकर ९०.६०, पल्लवी राजेंद्र भोयर ९१.२०, कु. इशा संजय गावंडे ९३.२०, प्रतीक्षा रामदास नेहारे ९०.४०, अनुष्का राजेश तिडके ९२.४०, जुही विनोद ठाकरे ९२.८०, अंजली भास्करराव डोळस ९०.२०, मनीषा महेश ठाकरे ९०.६०, निकिता रवींद्र खरतडे ९३.२० या सर्व विद्यार्थीनिनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.

कु. वैष्णवी राजू बोडखे
९८.४० टक्के गुण
शाळेत प्रथम

कु. तन्वी मंगेश कंवर
९८.०० टक्के गुण
शाळेत द्वितीय

कु. वैभवी गजानन माहुरे
९६.८० टक्के गुण
शाळेत तृतीय

पालक शिक्षक संघ वार्षिक आमसभा २०१७ - २०१८.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात पालक सभा दि. ०४/०८/२०१७ रोजी विशुद्ध विद्यालय संस्थेचे सचिव मा. श्री. सतीश फाटक यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. चंद्रकांत रानडे, श्री. विजयराव कासलीकर, शाळा समिती सदस्य सौ. मंगलाताई तांबेकर, सौ. माधुरीताई रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

     प्रतिमा पूजनाने सभेची सुरवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती देशपांडे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली.पर्यवेक्षक श्री. सिंगरु सर यांनी मागील वर्षीचे अहवाल वाचन केले. पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी समाधान व्यक्त केले व कौतुक केले.

श्री.विजयराव कासलीकर यांनी विद्यार्थी शाळेचा केंद्रबिंदू समजून त्यांचा सर्वांगीण विकास करणे संस्थेचे ध्येय आहे असे आपल्या भाषणात सांगितले. श्री. चंद्रकांत रानडे यांनी मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्याला सक्षम करणे आजच्या काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा. श्री. सतीश फाटक यांनी शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचा  सक्रिय सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजीची प्रयोगशाळा व १००% निकालाचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

त्यानंतर पालक शिक्षक संघ व माता पालक संघ कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवेंद्र भिसे व आभार प्रदर्शन सौ. राठोड यांनी केले.

गुरुपौर्णिमा कार्यक्रम - १०/०७/२०१७

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शाळेतील जेष्ठ शिक्षिका कु. कल्पना पांडे यांनी आपल्या भाषणातून गुरु व सद्गुरू यांचा अर्थ सांगितला. तसेच गुरूंचे जीवनातील स्थान या विषयी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून पुस्तके व आपल्याला जीवनात आलेले अनुभव हे आपले गुरूच असतात हे निरनिराळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.

विद्यार्थनींनी आपल्या वर्गशिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला व त्यांचे आशीवार्द घेतले.

  प्रशाले विषयी थोडेसे ...... :

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालय, महाराष्ट्रात नावाजलेली शाळा. विद्यालयालाची स्थापना १ जुलै १९५७ रोजी झाली. ७ विद्यार्थिनीवर सुरु झालेल्या या शाळेची आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे . सत्र २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात वर्ग ५ ते १० च्या एकूण १०३० विद्यार्थिनी आहेत. राणी लक्ष्मीबाई विद्यालय म्हणजे शिस्त आणि सुसंस्कार ! आणि म्हणूनच लोकप्रिय. कोणत्याही शाळेची गुणवत्ता ही शालांत परीक्षेच्या निकालावर ठरत असते. ही उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने कायम राखलेली आहे. क्रीडाक्षेत्रातही शाळेचा प्रगतीचा आलेख चढताच आहे. शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आहे. शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी १८९५ व शिक्षकांसाठी ९५२ पुस्तके आहेत. शाळेत सुसज्ज घोष पथक आहे.

मुख्याध्यापिका - सौ. ज्योती दीपक देशपांडे
पर्यवेक्षक - श्री. प्रशांत अरविंद सिंगरु
शाळेचा पत्ता - शिवाजी नगर, यवतमाळ ४४५००१, महाराष्ट्र, भारत.
इ मेल – rlvytl@gmail.com
युडायस क्रमांक – २७१४१५१२८०४
फोन नंबर - ०७२३२ - २४४४५२

शालेय समिती 2017 - 2018

सौ. शर्मिला सतीश फाटक              अध्यक्षा             संस्था प्रतिनिधी
सौ. ज्योती दि. देशपांडे                   सचिव                मुख्याध्यापिका
सौ. सुषमा वि. दाते                         सदस्य               संस्था प्रतिनिधी
सौ. मंगला र. तांबेकर                     सदस्य               संस्था प्रतिनिधी
सौ. माधुरी रा. रानडे                       सदस्य               संस्था प्रतिनिधी
सौ. दीपा उ. क्षीरसागर                   सदस्य               शिक्षक प्रतिनिधी
श्री. अनिरुद्ध व. पटाईत                  सदस्य              शिक्षकेत्तर प्रतिनिधी

शालेय प्रार्थनेचे महत्व व स्वच्छता अभियान

दिनांक ०४/०७/१७ रोजी 'तरुण भारत ' दैनिकामार्फत आयोजित शालेय प्रार्थना  व स्वच्छता अभियानाअंतर्गत शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशपांडे, 'तरुण भारत ' चे संपादक श्री अनिरुद्ध पांडे, प्रमुख वक्ते म्हणून  'तरुण भारत ' चे वार्ताहर श्री. विवेक कवठेकर, शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.श्री प्रसाद कुलकर्णी यांनी प्रार्थनेचे महत्व विशद केले. श्री. विवेक कवठेकर यांनी  स्वच्छतेचे महत्व व  स्वच्छता अभियान याबद्दल माहिती दिली. शिक्षिका सौ. जाधव यांनी विद्यर्थिनिंना  स्वच्छतेची शपथ दिली.

वृक्षारोपण

दिनांक ०१/०७/१७ रोजी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. देशपांडे यांनी 'वृक्षारोपण आणि  वृक्षसंवर्धन ' या विषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, व शाळेतील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या.

'जीवनात योगासनाचे महत्व '

दिनांक २८/०६/१७ रोजी जिल्हा क्रीडाभारती आणि श्री जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने योगाभ्यासाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री सतीश फाटक होते. या कार्यक्रमाला  क्रीडाभारतीचे प्रमुख श्री दिलीप राखे, श्री महेश जोशी, श्री मनीष दुबे, श्री मयुरेश सहस्रबुद्धे, कोमल मिश्रा व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच विशुद्ध विद्यालय संस्थेच्या सर्व घटक संस्थांचे प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 'जीवनात योगासनाचे महत्व ' या विषयी मार्गदर्शन व  योगाचे प्रशिक्षण दिले. योगगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दर शनिवारी योग तासिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.