Ekvira Managing Committee

एकविरा माजी विद्यार्थी संघटना

विवेकानंद विद्यालय यवतमाळ, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ व व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर दि. 24-10-2023 रोजी झाली आहे. ही संघटना विशुद्ध विद्यालयाच्या अंतर्गत काम करेल व नंतर कालांतराने स्वतंत्र पंजीकृत सोसायटी म्हणून गठित होईल. सुरवातीला हंगामी समिती गठित केली आहे.
विशुद्ध विद्यालयाचे अध्यक्ष हे संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक व व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक हे  संघटनेचे पदसिद्ध सभासद राहतील. त्यशिवाय या समितीत 7 माजी विद्यार्थी हे सदस्य राहतील. त्यामध्ये कमीतकमी 2 महिला असतील.

सदस्यांची नावे

1 श्री.  विनायक दाते अध्यक्ष
2 श्री. शशांक देशमुख उपाध्यक्ष
3 सौ. मंगला रविंद्र तांबेकर सचिव
4 श्री. विजय देशपांडे सहसचिव
5 श्री. प्रसाद कुलकर्णी कोशाध्यक्ष, मुख्याध्यापक-राणी लक्ष्मीबाई विद्यालय
6 श्री. श्यामकांत डगवार सदस्य
7 श्री. अविनाश लोखंडे सदस्य
8 श्रीमती भाग्यश्री बापट सदस्य
9 श्री. अविनाश वेलंकीवार सदस्य
10 सौ. मीनाक्षी काळे सदस्य, मुख्याध्यापिका-विवेकानंद विद्यालय
11 सौ. स्वाती जोशी सदस्य, मुख्याध्यापिका-व्यंकटेश विद्यालय