E-learning in schools
ई – लर्निंग
विशुध्द विद्यालयाने ई – लर्निंग उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विवेकानंद विद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे दोन वर्ग कॉम्प्युटर व प्रोजेक्टर सहित तयार केले आहेत.
विषयातील कठीण भाग शिकविण्यासाठी ई – लर्निंग ही उत्तम पूरक पध्दत आहे. ५ वी ते १० वी पर्यंत सर्व विषयातील कठीण भाग ई – लर्निंग पध्दतीने शिकविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय चांगल्या प्रकारे समजतो व त्या विषयाची गोडी निर्माण होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे.
