(Alumni of Vivekanand Vidyalaya, Rani Laxmibai Vidyalaya and Vyankatesh Vidyalaya)
विशुद्ध विद्यालय, शिवाजी नगर, यवतमाळ – 445001
वेबसाइट – vishuddha.org.in/alumni Email – president@dateycollege.edu.in
विवेकानंद विद्यालय यवतमाळ, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ व व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी यांच्या माजी विद्यार्थ्यांची "एकविरा माजी विद्यार्थी संघटना" (एकविरा म्हणजे एकत्रित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई) 24 ऑक्टोबर 2023 विजयादशमीच्या सुमुहूर्तावर स्थापन झाली आहे. विशुद्ध विद्यालयाच्या अंतर्गत संघटनेची हंगामी समिती गठित करण्यात आली आहे. कालांतराने स्वतंत्र पंजीकृत सोसायटी म्हणून गठित होईल.
विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय व व्यंकटेश विद्यालय यांच्या माजी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/ov7kF5syZBZFKNRS9 या लिंकवर कृपया ऑनलाइन नोंदणी करावी. नावाची नोंदणी निःशुल्क आहे. नोंदणीच्या अर्जाचा नमूना https://vishuddha.org.in/alumni या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे ही नोंदणी फक्त संघटनेच्या सभासदत्वासाठी आहे.