व्यंकटेश विद्यालय, घोडखिंडी : २०२०-२१ दहावीचा निकाल 100 टक्के
यवतमाळ, दिनांक 16 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यवतमाळ जवळील घोडखिंडी येथील व्यंकटेश विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून 29 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 29 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 100% इतकी आहे.
कु दुर्गा सत्यनारायण मंदिलकार हिने ८८.४० % गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. कु.साक्षी सुनील हेमणे हिने ८७.६०% गुण मिळवून दुसरा व कु. छाया संजय उघडे ही ८७.००% गुण मिळवून तिसरी आली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे विशुध्द संस्थेचे सर्व संचालक मंडळ, व्यंकटेश विद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले असून भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या.
कु. दुर्गा स. मंदिलकार
८८.४० % गुण
प्रथम क्रमांक
कु.साक्षी सु. हेमणे
८७.६०% गुण
दुसरा क्रमांक
कु. छाया सं. उघडे
८७.००% गुण
तिसरा क्रमांक