राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील देवयानी सुवर्णपदकाची मानकरी

दि.23/12/2018 ते 26/12/2018 या कालावधीत मुंबई येथे राष्ट्रीय स्तरावरील 64वी शालेय क्रिडा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धांमध्ये 'रोल बॉल स्केटिंग' ह्या क्रिडाप्रकारात राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कु. देवयानी विनोद नित ही विद्यार्थिनी सहभागी झाली होती. तीच्या चमूने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून  देवयानी सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. अभिनंदन!!!

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे हॉकी स्पर्धेत घवघवीत यश

क्रीडा व युवकसेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सहकार विद्यामंदीर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन दिनांक 4 ते 6 आक्टोबर 2018 दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची चमू विजयी झाला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. या संघात सायली वझाडे, स्मृती बिजागरे, पलक सवाईमुल, श्वेता धुमाळ, ईश्वरी डंभे, गायत्री पुरी, संस्कृती आत्राम, चंदना चाहांदे, जान्हवी वानखडे, रियानी गाडेकर, खुशी गवळी, राधा जाधव, समिता हांडे, मिनल शिवणकर, विदुला केळतकर, श्रेया वासेकर, प्रिती गवळी, आयुषी राठोड या विद्यार्थिनींचा सहभाग होता.
क्रीडा व युवकसेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापुर आणि जिल्हा क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धा दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर 2018 दरम्यान मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम कोल्हापुर संपन्न झाल्या. या स्पर्धेमधुन महाराष्ट्र राज्याचा हॉकी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला. यात स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची कु. सायली प्रफुल्ल वझाडे हीची निवड करण्यात आली.
दिनांक 29 नोव्हेबर ते 3 डिसेंबर 2018 या कालावधीत रांची येथे 17 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील अंतीम फेरीत महाराष्ट्र राज्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या संघात  स्थानिक राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची कु. सायली प्रफुल्ल वझाडे हिने गोल किपरची भुमिका यशस्वीपणे पार पाडली.
खेळाडूंच्या यशाबद्दल विशुध्द विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, उपाध्यक्ष सौ.विद्याताई केळकर, सचिव श्री. सतिश फाटक सहसचिव सौ. शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे, पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्याऱ्यांनी कौतुक केले. खेळाडूंना क्रिडा शिक्षक श्रीकांत देशपांडे, मुकुंद हामंद, प्रशिक्षक मनिषा आकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

कु. वैष्णवी राजू बोडखे
९८.४० %
शाळेत प्रथम

कु. तन्वी मंगेश कंवर
९८.०० %
शाळेत द्वितीय

कु. वैभवी गजानन माहुरे
९६.८० %
शाळेत तृतीय

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे शालांत परीक्षेत घवघवीत यश

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचा सत्र २०१७-२०१८ चा १० वी चा निकाल ९५.७२ टक्के लागला. यावर्षी शालान्त परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण १८७ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी १७९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.

उत्तीर्ण विद्यार्थीनीन पैकी ५२ विद्यार्थीनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या. यातील १८ विद्यार्थीनिनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून यशोशिखर गाठले आहे. विद्यालयातील कु. वैष्णवी राजू बोडखे ९८.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर कु. तन्वी मंगेश कंवर ९८.०० टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमाक प्राप्त केला.

कु वैष्णवी राजू बोडखे हिने संस्कृत व गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. कु. जुही विनोद ठाकरे हिने संस्कृत विषयात तर कु. संजना सुहास कानांव हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. कु. वैभवी गजानन माहुरे ९६.८०, संजना सुहास कान्नव ९६.६०, कु. तनुश्री राजेंद्र मुके ९६.२०, कु. नंदिनी नरेंद्र जगदाळे ९६.६०, कु. धनश्री सुभाष आगाशे ९५.४०, कु. हितैषी मनोज नामदेववार ९४.२०, कु. ऋतुजा सुभाष आंबटकर ९०.६०, पल्लवी राजेंद्र भोयर ९१.२०, कु. इशा संजय गावंडे ९३.२०, प्रतीक्षा रामदास नेहारे ९०.४०, अनुष्का राजेश तिडके ९२.४०, जुही विनोद ठाकरे ९२.८०, अंजली भास्करराव डोळस ९०.२०, मनीषा महेश ठाकरे ९०.६०, निकिता रवींद्र खरतडे ९३.२० या सर्व विद्यार्थीनिनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.

Top