Rani Laxmi Bai Vidyalaya

पालक शिक्षक संघ वार्षिक आमसभा २०१७ - २०१८.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात पालक सभा दि. ०४/०८/२०१७ रोजी विशुद्ध विद्यालय संस्थेचे सचिव मा. श्री. सतीश फाटक यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. चंद्रकांत रानडे, श्री. विजयराव कासलीकर, शाळा समिती सदस्य सौ. मंगलाताई तांबेकर, सौ. माधुरीताई रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

     प्रतिमा पूजनाने सभेची सुरवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती देशपांडे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली.पर्यवेक्षक श्री. सिंगरु सर यांनी मागील वर्षीचे अहवाल वाचन केले. पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी समाधान व्यक्त केले व कौतुक केले.

श्री.विजयराव कासलीकर यांनी विद्यार्थी शाळेचा केंद्रबिंदू समजून त्यांचा सर्वांगीण विकास करणे संस्थेचे ध्येय आहे असे आपल्या भाषणात सांगितले. श्री. चंद्रकांत रानडे यांनी मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्याला सक्षम करणे आजच्या काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा. श्री. सतीश फाटक यांनी शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचा  सक्रिय सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजीची प्रयोगशाळा व १००% निकालाचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

त्यानंतर पालक शिक्षक संघ व माता पालक संघ कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवेंद्र भिसे व आभार प्रदर्शन सौ. राठोड यांनी केले.

गुरुपौर्णिमा कार्यक्रम - १०/०७/२०१७

राणी लक्ष्मीबाई विद्यालयात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शाळेतील जेष्ठ शिक्षिका कु. कल्पना पांडे यांनी आपल्या भाषणातून गुरु व सद्गुरू यांचा अर्थ सांगितला. तसेच गुरूंचे जीवनातील स्थान या विषयी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून पुस्तके व आपल्याला जीवनात आलेले अनुभव हे आपले गुरूच असतात हे निरनिराळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.

विद्यार्थनींनी आपल्या वर्गशिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला व त्यांचे आशीवार्द घेतले.


  प्रशाले विषयी थोडेसे ...... :

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई विद्यालय, महाराष्ट्रात नावाजलेली शाळा. विद्यालयालाची स्थापना १ जुलै १९५७ रोजी झाली. ७ विद्यार्थिनीवर सुरु झालेल्या या शाळेची आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे . सत्र २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात वर्ग ५ ते १० च्या एकूण १०३० विद्यार्थिनी आहेत. राणी लक्ष्मीबाई विद्यालय म्हणजे शिस्त आणि सुसंस्कार ! आणि म्हणूनच लोकप्रिय. कोणत्याही शाळेची गुणवत्ता ही शालांत परीक्षेच्या निकालावर ठरत असते. ही उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने कायम राखलेली आहे. क्रीडाक्षेत्रातही शाळेचा प्रगतीचा आलेख चढताच आहे. शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आहे. शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी १८९५ व शिक्षकांसाठी ९५२ पुस्तके आहेत. शाळेत सुसज्ज घोष पथक आहे.

मुख्याध्यापिका - सौ. ज्योती दीपक देशपांडे
पर्यवेक्षक - श्री. प्रशांत अरविंद सिंगरु
शाळेचा पत्ता - शिवाजी नगर, यवतमाळ ४४५००१, महाराष्ट्र, भारत.
इ मेल – rlvytl@gmail.com
युडायस क्रमांक – २७१४१५१२८०४
फोन नंबर - ०७२३२ - २४४४५२

शालेय समिती 2017 - 2018

सौ. शर्मिला सतीश फाटक              अध्यक्षा             संस्था प्रतिनिधी
सौ. ज्योती दि. देशपांडे                   सचिव                मुख्याध्यापिका
सौ. सुषमा वि. दाते                         सदस्य               संस्था प्रतिनिधी
सौ. मंगला र. तांबेकर                     सदस्य               संस्था प्रतिनिधी
सौ. माधुरी रा. रानडे                       सदस्य               संस्था प्रतिनिधी
सौ. दीपा उ. क्षीरसागर                   सदस्य               शिक्षक प्रतिनिधी
श्री. अनिरुद्ध व. पटाईत                  सदस्य              शिक्षकेत्तर प्रतिनिधी

शालेय प्रार्थनेचे महत्व व स्वच्छता अभियान

दिनांक ०४/०७/१७ रोजी 'तरुण भारत ' दैनिकामार्फत आयोजित शालेय प्रार्थना  व स्वच्छता अभियानाअंतर्गत शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशपांडे, 'तरुण भारत ' चे संपादक श्री अनिरुद्ध पांडे, प्रमुख वक्ते म्हणून  'तरुण भारत ' चे वार्ताहर श्री. विवेक कवठेकर, शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.श्री प्रसाद कुलकर्णी यांनी प्रार्थनेचे महत्व विशद केले. श्री. विवेक कवठेकर यांनी  स्वच्छतेचे महत्व व  स्वच्छता अभियान याबद्दल माहिती दिली. शिक्षिका सौ. जाधव यांनी विद्यर्थिनिंना  स्वच्छतेची शपथ दिली.

वृक्षारोपण

दिनांक ०१/०७/१७ रोजी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. देशपांडे यांनी 'वृक्षारोपण आणि  वृक्षसंवर्धन ' या विषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, व शाळेतील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या.

'जीवनात योगासनाचे महत्व '

दिनांक २८/०६/१७ रोजी जिल्हा क्रीडाभारती आणि श्री जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने योगाभ्यासाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री सतीश फाटक होते. या कार्यक्रमाला  क्रीडाभारतीचे प्रमुख श्री दिलीप राखे, श्री महेश जोशी, श्री मनीष दुबे, श्री मयुरेश सहस्रबुद्धे, कोमल मिश्रा व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच विशुद्ध विद्यालय संस्थेच्या सर्व घटक संस्थांचे प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 'जीवनात योगासनाचे महत्व ' या विषयी मार्गदर्शन व  योगाचे प्रशिक्षण दिले. योगगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दर शनिवारी योग तासिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.

1st SSC 2017 कु. साक्षी गणेश इंगोले

2nd SSC 2017 कु. वैष्णवी विठ्ठल रजनलवार

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा १० वी निकाल ९५.०६ टक्के

यावर्षी शालान्त परिक्षेसाठी विद्यालयातून एकूण १६२ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी १५४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण विद्यार्थीनींपैकी ६०  विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या. यातील १५ विद्यार्थिनिंनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण  प्राप्त करून यशोशिखर गाठले.

विद्यालयातील कु. साक्षी गणेश इंगोले  ९८.६० % गुण प्राप्त करून प्रथम  तर कु. वैष्णवी विठ्ठल रजनलवार हिने (खेळ गुणांसह ) ९९.०० % गुण प्राप्त केले.

कु. साक्षी गणेश इंगोले  हिने संस्कृत व विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण,  कु. वैष्णवी विठ्ठल रजनलवार व कु. अनुजा राजेंद्र सावरकर यांनीं गणित विषयात १०० पैकी १०० गुण, कु. वैष्णवी कोल्हे हिने संस्कृत व सामाजिक शास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.

शाळेचा पहिला दिवस ...... सत्र २०१७ - १८

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग अँड बर्निंग मशीन उदघाटन कार्यक्रम

‘स्वच्छ भारत’ या अभियाना खाली  रोटरी क्लब व माजी विद्यार्थी (विवेकानंद विद्यालय १९८८) यांच्या संयुक्त्त विद्यमाने 'सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग अँड बर्निंग मशीन' उदघाटन सोहळा दि. २७/०७/२०१७  रोजी शाळेच्या प्रथम दिनी आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. श्री संजय वंजारी, सचिव मा.श्री. अविनाश लोखंडे व विशुद्ध संस्थेचे सचिव मा. श्री. सतीश फाटक आणि सहसचिव मा. सौ. शर्मिलाताई फाटक, तसेच संस्थेच्या संचालिका सौ. सुषमाताई दाते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे, माजी विद्यार्थी राजेश्री सुभेदार, श्री. अजय सक्रावात, वासुदेवराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग अँड बर्निंग मशीनचे उदघाटन मा. सौ. सुषमाताई दाते यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थिनींसमोर प्रतिपादित केले. तसेच मशीन चा योग्य वापर व उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन शाळेच्या माजी विद्यार्थीनी राजेश्री सुभेदार यांनी केले. या उपक्रमाबद्दल रोटरी क्लब व माजी विद्यार्थी (विवेकानंद विद्यालय १९८८) चे सर्वांनी अभिनंदन केले.

Top