HSC २०१६ – १७ तील विवेकानंदाचे नेत्रदीपक यश

विवेकानंद उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेचा निकाल ९८.७० टक्के लागला. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या ३० मे रोजी जाहीर झालेल्या निकालात यवतमाळच्या विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.  विद्यालयातून १२ वीच्या परीक्षेस ७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९८.७० इतकी राहिली.

विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त विदयार्थी संख्या २०, अभिषेक गजानन पावा याने ९०.९२ टक्के गुण प्राप्त करीत विद्यालयातून प्रथम येणाचा बहुमान मिळवला. संकेत आकाश ओलपवा हा ८४.३० टक्के गुणांसह दुसरा तर दिपाली बंडू गंथाडे ८२.६१ टक्के गुणांसह तृतीय राहिली. प्रथम श्रेणीत २९ तर दुसऱ्या श्रेणीत २१ विद्यार्थी आहेत. या उत्कृष्ट निकालाचे सर्वांनी कौतुक केले.

Top