सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग अँड बर्निंग मशीन उदघाटन कार्यक्रम

‘स्वच्छ भारत’ या अभियाना खाली  रोटरी क्लब व माजी विद्यार्थी (विवेकानंद विद्यालय १९८८) यांच्या संयुक्त्त विद्यमाने 'सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग अँड बर्निंग मशीन' उदघाटन सोहळा दिनांक २७/०७/२०१७  रोजी शाळेच्या प्रथम दिनी आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. श्री संजय वंजारी, सचिव मा.श्री. अविनाश लोखंडे व विशुद्ध संस्थेचे सचिव मा. श्री. सतीश फाटक आणि सहसचिव मा. सौ. शर्मिलाताई फाटक, तसेच संस्थेच्या संचालिका सौ. सुषमाताई दाते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती देशपांडे, माजी विद्यार्थी राजेश्री सुभेदार, श्री. अजय सक्रावात, वासुदेवराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग अँड बर्निंग मशीनचे उदघाटन मा. सौ. सुषमाताई दाते यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थिनींसमोर प्रतिपादित केले. तसेच मशीन चा योग्य वापर व उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन शाळेच्या माजी विद्यार्थीनी राजेश्री सुभेदार यांनी केले.

            या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. देवेंद्र भिसे सर यांनी केले. आभार प्रदर्शन मा श्री. सुशील बत्तलवार सर यांनी केले.

या उपक्रमाबद्दल रोटरी क्लब व माजी विद्यार्थी (विवेकानंद विद्यालय १९८८) चे सर्वांनी अभिनंदन केले.

Top